Porn Not Okay.. Please

चंग्या - आज रात्री आपण पॉर्न बघत बघत ग्यानोबा माऊली तुकाराम तुकाराम करूत
बेबी - यक्क.. बावळ्ळट्ट आहेस का तू ?
चंग्या - मजा येईल. माझा एक मित्र करतो असं. खूपजणं करतात.
बेबी - तुझा मित्र जे काय करतो गेला उडत. पण त्याला मजा येते म्हणून तशीच मज्जा तू माझ्या गळी उतरवायचा प्रयत्न नको हं करूस.
चंग्या - तुला लाज वाटते का.. ऑकवर्ड वाटतं का..
बेबी - छे छे मला ते सारं पार चोथा होईपर्यंत बघून बघून आता ज्याम कंटाळा आलाय. तसंही मी समोर असताना उत्तेजित होण्यासाठी तुला ह्या वयात पोर्नचा हात लागत असेल तर तो जगन्नाथच तुझं रक्षण करेल. मी असल्याने ऑन होत नसते. लाईट ऑफ करते. मला बडी भयंकर झोप आलीये. तू बघत बैस पॉर्न. एंजॉय.

Comments