Beautiful

पुरावं लागेल स्वत:ला पुन्हा उगवण्यासाठी
रहा उभा. रहा उभी.
मान खाली करून कोसळ पायाशी
कोसळ पायाशी डोळ्यातल्या पाण्यासकट
कोसळ पायाशी
ताकद आहे तुझ्या पाऊल पाचोळ्यात
अजूनही रूजण्याची

आधी सडशील हळूहळू
मग होऊ लागेल विघटन
मातीत मिसळता मिसळता आठवू लागेल
मेहरबान होत फटकारून टाकणारा प्रत्येक क्षण
सोपं नसेल असलेलं सगळं नाकारून
पुन्हा करणं नव्याने सुरवात
सोपच नसतच नवा जन्म घेण्यासाठी
आपणच बनणं आपला आईबाप
सुंदर आहेस तू .. ओह .. किती सुंदर |

Comments

  1. पुरावं लागेल स्वत:ला पुन्हा उगवण्यासाठी... खरय 👍👌👍👌

    ReplyDelete

Post a Comment