आर्ट आणि पैसा

कुठलीही नवी गोष्ट करताना ती खपणार का,लोकांना आवडणार का, किती पटकन रीझल्ट मिळेल, मी करणार ते अमुक तमुक गाजेल का.. अश्या चिंता करून आपल्याला जे करतोय ते करायला आवडणार आहे का, ते केल्याने मजा येणार आहे का, ते करत असताना घड्याळ्याचा विसर पडणार आहे का, ते लोकांना आवडलं नाही तरी मला ते करायला आवडतं लोकं गेली खड्ड्यात इ. असे विचार का न यावेत. जे करण्याबाबत आपण स्वत:च साशंक असू त्यात आपण कसे दिसणार आणि मग ते लोकांना तरी का आवडेल?
जे करायचं असतं तिथे अर्थाजन हा महत्वाचा उद्देश असतो. पण जरा बरे चाललेले असेल तर आवडीचे करताना तिथे पैशाचे गणित आधी विचारात न घेणं जास्त हिताचं वाटतं मला. आर्टमधे मग ती कोणतीही असो त्यात पैसा आला की सारं वेगवेगळ्या गोष्टींच्या नियंत्रणाखाली येतच. मग बदल करावे लागतात. मनासारखं हवं ते प्रॉडक्ट काढून मग पहावं पैसाबैसा. तोवर ती स्पेस ह्या सगळ्या विचारांच्या धास्तीने कोंडून घेण्यात काय अर्थाय?

Comments