इंटेन्स

बेबी - मी खूप आत्मियतेनं पाहू शकते कोणत्याही गोष्टीकडे. खोलात.
चंग्या - हममम.. तुला गालावर किस करू.. खोल खोल..?
बेबी - मी नं म्हणजे मला नं वेदना खूप काही देऊन जातात. कथा, कविता, त्यातली अलंकारिक भाषा क्वचित समजली नाही तरी त्यातली वेदना माझ्यापर्यंत पोहोचते. लिहणार्याची अभिव्यक्ती.. जाणीवा.. नेणिवा..
चंग्या - मम्मी येईल आता दोन तासांनी त्याआधी हा शब्दांचा फोअरप्ले कसा रंगात आलाय.. मी धन्य झालो.
बेबी - तू गप रे. नेहमी आपली मस्करी मस्करी. पण मी कशी आहे तेही तुला कळायला हवं ना.. मी लोकांच्यात फार नसते. मी एकटी असते. म्हणजे एकाकी दु:खी असं नाही हं पण मग वेगवेगळ्या गोष्टी करता येतात स्वत:त गुंतल्यामुळे.
चंग्या - मग ह्या एकांतात काहीतरी करूया नं झालं ना बोलून.. नाही का.. बरं चालू दे.
बेबी - ए तू गप रे.. नेहमी आपली मस्करी मस्करी. मी ना मी.. ठरवलय. आयुष्याचा काय भरौसा..
चंग्या - ऑ..
बेबी - आयुष्याचा काय भरौसा.. त्याआधी परमेश्वराने दिलेल्या ह्या क्षणभंगुर श्वासांमध्ये मला रसरसून जगायला हवय.
चंग्या - रसाला वेळ आहे अजून.
बेबी - ए तू गप रे. सारखी आपली मस्करी मस्करी. हूं. रसरसून जगता आलं पाहिजे. नाहीतर काय आपण असेच टिपिकल जगताना किड्यामुंग्यांसारखे मरून जाणार.
चंग्या - किड्या मुग्यांचं बरं असतं. झोपायचं, खाण्यासाठी कष्ट करायचे. मग मिळेल त्या पटेल त्या मादीशी सेक्स करायचं. त्या माद्याही नराबाबत पझेसिव्ह होत नाहीत. आज हा की उद्या तो. आपलं पोर कोणतं नी त्यांचा बाप कोणता ह्याविषयी त्यांच्या जिवाला जाळ नसतो. मला कबुतरं अजिबात आवडत नाही. घाणेरडा प्राणी.
बेबी - पक्षी. 
चंग्या - स्स स्स.. हो. पण मी आतून कबुतरच आहे असं मला वाटतं.
बेबी - श्शी याक्क.. काही कॉय्य..
चंग्या - हो. ते कबुतर असतं ना च्यायला ते एका जागी तासन तास बसून रहातं. खातं बसतं खातं बसतं. हगतं. बाकी अख्खा वेळ सेक्स सेक्स सेक्स.
बेबी - ए तू गप रे.. सारखी आपली मस्करी मस्करी. किती घॉण घॉण बोलतोस.
चंग्या - तुला पाळी आलीये ना.. म्हणजे तुझ्याकडे पाहून तरी वाटतं की तू मोठी झाली असावीस. हं हं हं.
बेबी - मी कुण्णा मुलाशी असं पटकन बोलत नाही. मी फार इंट्रोव्हर्ट आहे. पण तुझ्याशी बोलायला आले तर तू असा इतकाही पटकन बिनधास्त बोलू नकोस. टेक सम टाईम.
चंग्या - अरे कसलं बिनधास्त. एकमेकांना आवडलो की पहिल्या भेटीत फूल कपडे काढून फेकून देत धाडधूड धाडधूड करणार्या पोरींची मला सवय आहे. मी आतबाहेरून कबुतर आहे. मी २४ तास सेक्सचा विचार करणारा पुरूष आहे. मला त्याने आराम मिळतो. त्यात मी रसरसून जगतो अगदी माझ्यासारखा असतो उघडा वाईल्ड असं मला वाटतं. तर ते सांगताना शरम संकोच कायको ? बाकी रस म्हणलं की मला मे महिन्यातला पिवळा धम्मक आमरसच आठवतो. म्हणून तुला म्हणालो.. रसाला अजून वेळ आहे. अत्ता मार्च चालू आहे.
बेबी - ए तू गप रे. चिडेन हं मी अता. सारखी आपली मस्करी मस्करी.
चंग्या - बरं आता दोन तासाचा अर्धा तास उरलाय.. काय करायचंय.. पॅण्ट काढू की शर्ट काढू आधी तूच सांग.
बेबी - कमी वेळ असला ना की माणसातली जगण्याची असोशी, हाव वाढते. मला अश्या क्षणांचं फार आकर्षण आहे. मी फार इंटेन्स जगते.
चंग्या - इकडे ये इकडे ये..
बेबी - अरे प.. पण काय झालं.. काय काय? इतका कश्याने चवताळलास तू.. का का रे ढकलतोएस मला.. अरे दरवाज्याकडे का नेतोयस मला..?
चंग्या - गेट लॉस्ट. जा तुला काय इंटेन्स जगायचंय ते माझ्या घराबाहेर आणि माझ्या आयुष्याबाहेर जग भेंच्योत . डोक्याची वायझेड करून टाकली. काय चुतिया मुली असतात राव एकेक. इंटेन्स जगायचय म्हणे.. वाचवा या मुलींपासून.

Comments