ती पाहताच बाला कलिजा खलास झाला..

फेसबुकवरच्या काही स्त्रियांवर माझा बेक्कार क्रश आहे. दिल धडक जाता है. कुणाचं लिखाण, कुणाचा इथला वावर, कुणाची मान, कुणाचं ऐटबाज राहणं, कुणाचा फ्रीक आऊट स्वभाव, कुणाची विविध विषयात असलेली रूची आणि त्यात उतरून ते शिकण्याची चाहत, कुणाचा हस्की बस्की, सेक्सी, मधाळ, खणखणीत, मुलायम आवाज, कुणाचे काळेभोर डोळे, कुणाची चित्रं, कुणाच्या कविता, कुणाचा उत्साह, स्माईल, एरव्ही सायलेंट असणं आणि क्वचित जे आपल्याला आपल्या वा इतरांच्या वॉलवरचं मनापासून आवडलेलं असतं तिथेच त्यांनी नेमकं व्यक्त होणं, त्याला दाद देणं किंवा जे पटत नाही ते का नीटपणी सांगण्याची त्यांची पद्धत, काहींचा मजाकिया स्वभाव, काहींची डूडल्स, कविताप्रेम.., कुणाची आपलं विश्व उलगडून सांगण्याच्या बहोत खूब पद्धती, जे आहे ते असं आहे असं इथे राहता येण्यातली सरलता.. काहीजणी कोणत्याही कारणावरून आवडतात. इतक्या की त्यांचे फोटोच फोटो पहात बसते मी. प्रत्यक्षात नाही तरी त्यांच्याशी माझा काय कनेक्ट आहे.. तो का होतोय त्या का आवडतात मला ह्याचं एक कारण मिळालं बस.

फेसबुकवरच्या काही स्त्रिया इतक्या हॉट वाटतात की त्यांचे फोटो आले समोर की मनाला बजावते.. नको नको.. बास एकदा पाहिलास ना फोटो.. नको पाहूस आता. काय साला त्रास आहे.. पुढची दहा मिनिटं काही कामच होत नाही. अनेक स्त्रियांचे सेक्सच्युअल प्रेफरन्सेस पुरूष जरी असले तरी स्त्रियांना काही स्त्रियांकडे न्याहाळत बसायला मरणाचं आवडतं. आणि ते करत असताना त्या स्त्रीचं लक्ष असलं की जसं पुरषांना अवघड होतं तोच हाल ए दिल, ऑकवर्ड होणं इ. होत असतं. स्त्रियांना पुरूष लागतात पण त्या स्त्रिया स्त्रियांबाबत जरा जास्त दर्दी असतात. मी आहे. खोटं का बोला.. स्त्रिया स्त्रियांशी सूपर्ब फ्लर्ट करू शकतात. ते स्त्रियांना फार आवडतं. हवंही असतं. ते लेसबियन वगैरे झमेले त्यात लगेच येत नसतात. 😀

कुणी एक स्त्री फार फारच आवडते असं वाटत असताना विचार करू लागले की फक्त एकच आवडते का मला? नाही यार.. इथे तर खजाना आहे. एक बाई असून ह्या स्त्रियांना पाहतानाच मी घायाळ, ठार, बाद वगैरे होते अनेकदा. पुरूष असते तर.. 😀 कसं काय मॅनेज करतात पुरूष... इतकं काय काय आवडत असूनही शांतपणे फुटाची गोळी घेऊन जाणं सोपं असतय काय..?

Comments

Post a Comment