राडा विषय

Photo - Google

भारतातल्या स्त्रियांना सोन्याचा भारी शौक आहे. खूप सोनं घेतात आणि मग ते चोरीला गेलं की बोंबलत बसतात. सणावारी, लग्नाकार्यात पोळ्याच्या बैलासारख्या सोन्याची झूल लावून सजून जातात. हौस म्हणून जे घालतो ते शोभून तरी दिसतं का आपल्याला की दुसरं काही बरं दिसेल जरा कमी घातलं तर.. धड दिसू का आपण ह्याचा जर्रा विचार.. सॉरी हे मवाळ झालं.. हे समजण्याइतपत काडीचीही अक्कल नसते. हं हे ठीक आहे. एकूणच बहुसंख्य स्त्रिया ह्या मठ्ठ आहेत. बचाव बचाव.. सोन्याच्या मागे त्या इतक्या पागल आणि हावरट होतात की त्यासाठी त्या आईबापाला, सासुसासर्यांना त्यांच्या म्हातारपणी ते आपल्याला मिळावे म्हणून जाम नाडतात, नाही नाही ते टाकून तिरकस त्यांच्या जिव्हारी लागेल असे बोलतात. नवर्यांचा जीव घेतात. खून करतात.
त्या इतक्या पागल असतात की मेल्यावरही तोंडात सोन्याचा पत्रा दातात घट्ट धरूनच मग सरणावर चढतात. बचाव बचाव..
हिरा है सदा के लिये हे त्यांच्या इतकं गळी उतरलेलं आहे की हिर्यासारखा नवरा असेल तरी हिरे देणार्या दुसर्या पुरषाशी घरात नवरा असताना लफडी करतात, त्यांच्या नादाला लागण्याइतपत बेअक्कल असतात. बचाव बचाव.. अश्या अनेक स्त्रिया लोभी असतात पण त्यांचा हा अवतार त्या स्त्रिया असल्याने आणि सतत सहानुभूतीपात्र असल्याने पटकन उघड होत नाही. घरात बाका कठीण प्रसंग आला तरीही त्या पटकन आपले सोने सोडत नाहीत. अगदी जुगारी नवर्यावर कुणी केस केली आणि तो जेलमधे जाणार असे चित्र दिसले तरी नवर्यावरचे कर्ज फिटावे म्हणून त्या दुसर्याच कुणी पैसे उभे करण्याची वाट पहात बसतात पण आपले सोने मात्र काढत नाहीत. त्यावर सापासारख्या वेटोळं घालून बसतात. थोडक्यात सोनं हे गुंतवणूक म्हणून वापरली जाणारी कमॉडिटी आहे ह्याकडे त्या स्वार्थापोटी दुर्लक्ष करतात.
घर व कुटुंबिय कर्जबाजारी झाले तरी चालेल पण सोने मिरवता आले पाहिजे असे बुरसट विचार असल्याने त्या कायम तेच तेच सोने घालून दिखावूपणा करतात. पण बडा घर पोकळ वासा हे मान्य करत नाहीत. बचाव बचाव.. आपण कमवावे आणि आपण आपल्या हिंमतीवर सोने घ्यावे अशी काही इच्छा नसते. सारे सोने ह्या ना त्या रूपात माहेरून किंवा सासरहून फुकट मिळावे अशी मनात सुप्त इच्छा असते आणि जर का ते त्यांनी त्यांच्या पैशाने घेतलेले असेल तर ते शंभर वेळा बोलून दाखवतात इतक्या बावळट असतात. वाचवा वाचवा.. हेल्प हेल्प..
कुठूनही सोने फुकट मिळाले नसेल तर ती इच्छा अपूर्ण राहिली म्हणून मुलगा असल्यास सुनेने येताना घबाड आणावे आणि तेव्हा तरी सोने आपल्या पदरी पडावे अशी आशा बाळगूनच असतात. बचाव बचाव... सोन्यासाठी भारतीय स्त्रिया इतक्या पागल असतात की त्यासाठी बेनटेक्स आणि एक ग्रॅम ज्वेलरीचेही दागिने त्या घालताात. एकुणात सोन्याचा पिवळा रंग वगळता दागिन्यात अन्य रंग आणि सोन्यापेक्षा वेगळा धातूही दागिन्यात वापरला जातो हेही त्यांच्या गावी नसते इतक्या ह्या बिंडोक भारतीय स्त्रिया काळाच्या मागे असतात. बचाव बचाव बचाव..
..
वर पोस्टमधे लिहलेल्या विचारांशी लेखिका सहमत नाही. 

Comments

  1. ����kharach ahe he sonyachya daginyachya sankhevarun gharachi arthik sthiti samajik jate manasanna kadichi kimmat naste swanubhav

    ReplyDelete

Post a Comment