नक्षत्रं

चंग्या - गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे..
बेबी - गेल्या महिन्यात माझ्याकडून घाईघाईने पाच हजार रूपये घेऊन गेला होतास तेव्हा नड होती म्हणून. ते आधी दे. असल्या उधार्या विसरायला तू काय माझा नवरा नाहीस. आला मोठा नक्षत्रं देणारा..
चंग्या - पैसे देईन गं ते कुठे पळून जातात..
बेबी - तुझ्यासारखी बापाच्या जिवावर चैन करत फावल्या वेळात कविता करत बसत नाही मी. व्यवहार चोख असेल तर नाती टिकतात. आधी पैसे.. नाहीतर पुढच्यावेळेला खिशातल्या चारआठाण्यासारखा खर्च होऊन जाशील तूच बेट्या लक्षात ठेव.
चंग्या - 😨

Comments