हम पादता है तुम पादता है

बेबी - माझा पहिला बॉयफ्रेंड इतका बावळट होता नं.. अरे त्याला पादायला आलं तर धावत सुटला बाथरूमच्या दिशेने. पण काही आवाजांवर आपला ताबा नसतो आणि इट्स ओकेच म्हणजे. त्याचं हे ऑकवर्ड होणं मला अगदी बायका कश्या जांभई दाबतात, हसू दाबतात तसच.. त्याचं ते पादणं दाबल्यावर पाहिलं आणि आठवलं.
चंग्या - असं का नावं ठेवती गं बिचार्याला.. बिचारं. ऑकवर्ड झालं असल ते लेकरू. तो तुझ्या समोर जोरात पादला असता तरीही तुला कीळस आली असती. तुम्ही बायका फार हरामी असता. बिचार्या पुरषांना जर्रा म्हणून समजून घेत नाहीत.
बेबी - हे मात्र खरं. म्हणजे आता माझ्यासमोर जोरात पादायचं की ते दाबायचं.. नक्की काय करायचं ते तू ठरव.
चंग्या - अरे हाड्ड. हम पादता है तुम पादता है सारी दुनिया पादती है.. असा आपला उसूल आहे. मला माझी गर्लफ्रेंडच मुळात बिनधास्त पादणारी, ढेकर देणारी, जांभया देणारी हवीये. तेव्हा तूच काय करायचं ते ठरव. जर का दाबून हे असले प्रकार केलेस तर मात्र मीच तुला सोडून देईन.
बेबी - 😱😱😱

Comments