कुंकू

वितळणार्या मेणबत्तीच्या ज्योतीनं
काळ्या अंधाराला जाळून पाडलेलं
एक लहानखुजं प्रकाशमान भोक
मला तुझ्या कपाळावर कुंकवाने
पाडलेल्या भगडादासारखं वाटतं

तिथे रोज उजळत राहते नवी वेदना
तुझ्यासोबत चालत असताना
मला अंधारात चाचपडावं लागू नये ह्यासाठी

Comments