फाईन

मी ढोंगी आहे
माणसांमध्ये जगायचं असेल
त्यांच्यासोबत सलोख्याने रहायचं असेल
तर तो बुरखा पांघरल्याशिवाय पर्याय नसतो
माझ्यापुढे तुमच्यापुढे
कळलंय मला.

ज्यांच्यासमोर प्रामाणिकपणाने
ढोंगाचे सारे नकाब मी फेडले
त्यांना सहन झाले नसेल
माझे तसे नग्न होणे
मी मीच असणे जी जशी
किंवा त्यांना धाडस झाले नसेल
माझ्या नजरेला नजर मिळवून जगायचे
म्हणूनच निघून गेले ते
तू फार वाईट आहेस असं म्हणत..
फाईन.

Comments