प्लीजच म्हंजे..

बेबी - आपण वेगळं होऊया. फायनल.
चंग्या - कधी..
बेबी - तू म्हणशील तेव्हा..अत्ता. निघू का अत्ताच च्यायला..
चंग्या - माझ्या इतकं तुला सहन करणारा दुसरा कुणी पुरूष असेल, असं अजूनही वाटतं का तुला..
बेबी - जगण्यासाठी मला कायम सोबत एक पुरूष लागणारच आहे.. गैरसमज.
चंग्या - पण तू गेलीस तर हे मात्र लक्षात ठेव की मी बाईशिवाय राहू शकत नाही.
बेबी - मला डीव्होर्स हवाय. बास झालय.
चंग्या - ठीके मग आपण डीव्होर्स घेऊन मित्र म्हणून साथ साथ राहू. घरकामाला बाईही कश्याला ठेवायची मग ? तू सगळी कामं करत जा इथली. मी तुला त्याचा सेपरेट पगार देईन शिवाय रहायला जागा फुकट. तू बेडरूममधे झोपत जा. मी हॉलमधे झोपत जाईन. कधीकधी विजांचा कडकडाट झाल्यावर मला भीती वाटली तरच मी येईन आतमधे तुझ्या कुशीत.
बेबी - आपलं फार सीरियस भांडण झालय आणि आपण वेगळे होणार आहोत, अशी काही गंभीर चर्चा आपण एक तासाभरापूर्वी केली होती का?
चंग्या - तू दुसर्या कुठल्याही पुरषासोबत जा गं पण दोन दिवसात पुन्हा माझ्याकडे येशील.
बेबी - पण मी कुठल्याही पुरषासोबत जाणार नाहीये. मला पुरूषच नकोय आयुष्यात आता कुणीही. मला एकटच रहायचंय.. शिवाय आपण वेगळे झाल्यानंतर मी कुणासोबत राहीन झक मारीन तुला काय करायचंय..
चंग्या - असं कसं असं कसं.. मला काय करायचंय म्हणजे काय.. मी तर तुला सारखं सारखं विचारणार. तुला कुणी त्रास दिला तर सोडणार नाही त्या भोसडीच्याला मी.. ऐसा नही होताय.. 😀
बेबी - आपलं अत्ता जे भांडण झालं त्याने आपल्यात मारामारी झाली काही वेळापूर्वी. तू मला मारलस त्यावर मी तुझ्यावर चिमटा फेकून मारलेला होता. तो तुला लागलेला होता. आपण दोघेही रडलो. मग शांतपणे वेगळं व्हायचं ठरवलं. हे सगळं काही वेळापूर्वी झालय चांगदेव. तूच मला म्हणालास चिडून की चालती हो.. मग आता का पाणी लावतो आहेस.
चंग्या - तेच सांगतोय ऊठ चालती हो आणि माझ्या मिठीत ये. जास्त बडबड करू नकोस. जगातले सगळे नवराबायको भांडतात कुत्र्यामांजरांसारखे. टाईमपास होतो त्याने थोडा. आपल्यातली जनावरं त्यानं बाहेर पडतात. मग आपण रडतो, खोकतो, थकतो आणि कळतं की ही भांडणं खूप रडल्यानंतर नाकात भरून आलेल्या शेंबडासारखी शिंकरून फेकून द्यायची असतात. बघ मी किती समजूतदार आहे. यू आर सो लकी.
बेबी - प्लीजच म्हंजे..

Comments