हातोमें आ गया जो कल.. गुलाब आपका 😌😌

चंग्या - असं कुणी आणितं का इतक्या प्रेमानं महिला दिन आहे म्हणून बायकोला असा गुल्लाब ?
बेबी - इश्श.. नाही वो नाही वो
चंग्या - गुलाब आणितही असतील पण तो बायकोच्या गालावरून भुर्कन फिरून गालगुच्चा घेणारे असतील का?
बेबी - इश्श.. नाही वो नाही वो
चंग्या - तसं करणारेही असतील. पण बायकोच्या सुटलेल्या पोटावर तो गुलाब ठेऊन मग गुलाबाची आणि बेंबाटाची पापी घेणारे असतील का?
बेबी - इश्श.. नाही वो नाही वो
चंग्या - कुठाय तो गुलाब..
बेबी - तो कधीच वाळला. मी आज सकाळी कचर्याच्या डब्यात टाकूनही दिला.

Comments

Post a Comment