बाबाजीका ठुल्लू

लहानपणापासून आमच्या घरी विविध बाबाजींच्या, स्वामी आणि कोणकोणत्या महाराजांच्या इतक्या तसबिरी पाहिल्या. तेव्हाही हेच वाटे.. किती अश्लील आहे हे सारं. त्यात काही अश्लील नव्हतं पण आमच्या काळी कुणी कुणाला ' ए चुत्या..' म्हणालं तरी मारामार्या व्हायच्या वगैरे सात्विक. :P त्यामुळे उघडं ते अश्लील असं समीकरण होतं. म्हणजे अगडबंब पोट आणि खाली लंगोट आणि पाय वरती करून बसलेल्या त्या बाबाजीच्या फोटोवर डोकं टेकणार्या स्त्रियांची डोकी नको तिथे लागत असत हे पाहून तर काय च्या काय ई ई ई वाटे. उघड्या वाघड्या पुरषांचे फोटो जवळ बाळगता येत नसत तेव्हाच्या स्त्रियांना पण साला देवाच्या नावावर संतमहंतांचे उघडेपण सरळ पूजता येई. कपाळावर, ओठांवर टेकता येते. छातीला कवटाळता येई. ते सारे फार धार्मिक असेल. हे सारे बाबाजी लईच हुषार वाटत पहिल्यापासून. म्हणून मला शर्ट प्यांट घालणारे आधुनिक बुवा, गुरू, बापू हे जरा तुलनेने बरे वाटतात.

Comments

  1. Mag Ram rahim Baaba of dera saccha souda tar faarach changale watatil tumhala.

    ReplyDelete

Post a Comment