पश्चात्ताप

बाईच्या हलणार्या पोटावर
सैल पडलेल्या छातीवर
वाढलेल्या घेरावर
तिच्या कंबरेवरच्या वळ्यांवर
मांड्यावरच्या स्ट्रेचमार्क्सवर
अश्लील, हिणकस, गलिच्छ
बोलणार्या पुरषांना आणि
त्यावर दात काढणार्या स्त्रियांना
सांगावसं वाटतं
तुम्ही चुकूनही तुमच्या
आईच्या ओघळलेल्या छातीकडे पाहू नका
तुम्ही चुकूनही तिच्या सैल पडलेल्या
क्वचित दुखणार्या ओटीपोटाकडे पाहू नका
कारण
तुमच्यासारखी हरामी औलाद पैदा केली
हे जर त्या मातेला चुक्कून कळलं तर
तुमच्या जन्मासरशी स्तनांना फुटलेल्या दूधाकरवी
तुम्हांला ठार मारण्यासाठी
आपण तेव्हाच विष का प्यायलो नाही
ह्याचा तिला पश्चात्ताप होईल.

Comments