बाई बाई

माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक स्त्रियांनी मला अतीव दु:ख दिले, भळभळणार्या जखमा दिल्या, पाय खेचण्याचे प्रकार केले, मैत्री तोडली, मला वापरलं, माझ्याकडून खर्च करून घेतला आणि आपण स्वत: त्यावर मज्जा केली, त्यांनी पुरषांना वापरलं, सोडलं, फेकलं, अश्या अनेक जणी आल्या ज्यांनी मला गृहीत धरलं, खोटेनाटे आरोप केले, माझी बदनामी करण्याचे प्रयत्न केले. त्यामानाने भेटलेल्या मस्त पुरषांची संख्या जास्त आहे. बायकांपेक्षा पुरषांचा सहवास, त्यांच्याशी मैत्री, त्यांच्यात राहणं हे जास्त महत्वाचं आहे असं नाही म्हणणार पण बाई ही जास्त सहनशील असते, ती फार सच्ची असते, ती फार प्रामाणिक असते, तीच फार सहन करते, समजून घेऊ शकते असे सगळे समज होण्यापासून मी बचावले आणि पुरषांकडे मोकळ्या मनाने पाहू शकले ह्याबाबत हुश्श वाटतं कैकदा.
पुरूष जितके दुष्ट, अघोरी असू शकतात त्याहीपेक्षा त्यात काकणभर सरस असलेल्या स्त्रियाही जेव्हा दिसतात तेव्हा वाटतं फार बनवाट दु:ख आणि आकांत भरलेले आहेत बायांच्या जगात. त्यांना हलवण्यासाठी जास्तीजास्त पुरूष असावेत बाईच्या आयुष्यात. ते सगळं छान बॅलन्स करून ठेवतात बिघडलेलं. शांत असतात बर्यापैकी. बाहेर पुरूष आणि आतून बाई असलेले पुरूषही पाहिले. पळाले त्यांच्यापासून लांब.
ज्यांच्याशिवाय जगणं अळणी झालं असतं आणि ज्यांनी माझं जग, लेखन आणि एक स्त्री म्हणून माझी समज, भावना, संवेदनशीलता समृद्ध केल्या त्या सर्व पुरूषांची मी फार ऋणी आहे. I owe them a lot. You guys are Awesome. love you. 💜💖

Comments