जोडवी

चांगली चप्पल विकत घेण्यासाठी
पायातली जोडवी विकावीत
शेतकर्याच्या बायकोनं
असं म्हणतेस..
अगं बाई.. अंगावरचे जे काही किडूक मिडूक होते
ते सारे विकत विकत शेतकर्यांच्या कित्येक बायकांनी
किती काही उभे केले आणि
सांभाळलाय पायातल्या तुटक्या चपलेचा रक्ताळलेला आंगठा
त्या जोडव्यांमधून कसत राहतो तिचा अभिमान..
निदान ते औजार तरी विकायला सांगू नकोस
कृपा कर.

Comments