डान्स

चंग्या - मला बरं वाटतं कधी कधी..
बेबी - कसलं..
चंग्या - आपल्या सोसायटीत कार्यक्रम होतात त्यात तू नसतेस त्याचं. पद्मावत आल्यानंतर सगळ्यांनाच घुमर गाण्यावर डान्स करायचा होता.
बेबी - हं मग ?
चंग्या - अगंं काय त्या बायका आणि काय ती त्यांची सोंगं. इतक्या त्या ढोल्या ढोल्या बायकांना हत्तीसारख्या दणादणा नाचताना पाहून त्यांच्या नवर्यांना तर कुठे तोंड लपवू नी कुठे नको असं झालं होतं. हळूहळू गाण्यावर वयाला साजेसं नाचावं ना.. त्यात त्या एका बाईचा विगच पडला. तरी ती नाचत होती तर लोकांनी तिच्या धाडसाचं कोण कौतुक केलं. कश्याला असले धाडशी उद्योग करतात ह्या बाया.. बरं दिसतं का ते.. श्शी.
बेबी - त्या डान्समधे ना पहिल्या रांगेत असलेल्या दोघींमध्ये डावीकडे नाचणारी स्त्री मी होते. आणि तो विग पडूनही नाचणारी ती स्त्री.. तीही मीच होते.
चंग्या - 😱😱😱😱
बेबी - नीट बघ मला. बघ तुला तुझ्या बायकोची आठवण येते का ?

Comments