काय चुकलय संत्याच ?

संत्या कुणाच्या अध्यात मध्यात नव्हता
प्रेमळ, सालस, निगर्वी, इंट्रोव्हर्ट सा
घोळक्यात जसा श्वास घुसमटायचा त्याचा
तो टाळतो आपल्याला किंवा फाट्यावर मारतोय
असच समजे जो तो

सगळ्यांपासून लांब बसे
त्याच्याच विश्वात रममाण असे
कधी एकट्यातच मोठ्याने हसे

शांतासण्याचं कारण उकललं नाही
न उकरू दिलं त्याने कुणासही
मग तो गूढ वाटू लागला
कधी आकर्षक कधी हरवलेला सा
कधी कंटाळावाणा कधी माजोरडा सा

प्रश्नांवर त्याच निरूत्तर असणं
शांतच राहणं बाय चॉईस..
सोशल नसणं बाय चॉईस..

हा आहे सरकलेला सटकलेला
भटकलेला आत्मा
हा आहे अॅण्टीसोशल
ऑल टाईम उदास लव्हर - अतुल

लोकांची उत्सूकता शमवण्यात
संत्याकडे ना वेळ होता ना
रस त्यात झाटभरही
लौकरच अॅण्टीसोशल संत्याला
मग काहीच नाहीतर
' विकृत ' लेबल लाऊन खाका वर करून
मोकळी झाली खाजरी माणसं

झाड शांत असतं
दिल्या जागी रूजतं
सावकाश वाढतं वर वर
चांदण्याची दिशा धरून
त्याचा आवाज क्वचित !
थोडीफार सळसळ वार्या साथ
एक दिवस खट्कन कापून
मोकळी होतातच माणसं

मग काय चुकलंय संत्याच ?
संत्या what you say is right
'' बोच्यात गेली लोकं.. ''
पण तरीही मला सांगशील..

तू इतका शांत का असतोस ? 

Comments