सावकाश ये

योनी सोन्याची नसते पण 
सोनकळा घेऊन जन्म देते
सोन्यासारख्या जिवाला
हे करू शकणारी बाई
सार्या विकतच्या पेशी टाकून
सूक्ष्म होत पुन्हा त्याच सोनमार्गाने
प्रवेश करू शकते आपल्याच पोटात

नऊ महिने गोलगोल फिर एकाच जागेत
लाथा मार आकार घेण्यासाठी
शोषून घे आतल्या अंधारात
रोज साजरा होणारा काजव्यांचा महोत्सव
बाहेर येताना गर्भजलातच सोडून ये
तू पेटवलेले किंवा कुणी पेटवून तुला दिलेले
लखलखणारे दिवे
सावकाश ये सावकाश ये 

Comments

Post a Comment