हाड्ड


लैंगिकतेबाबत स्त्रीने बोलणे किंवा लिहणे ह्यावर टीका करणारे, तिला घाण ठरवणारे, तिची बदनामी करणारे आणि त्याची नाक्यावर बसून टवाळी करणारे प्युअर सेक्सिस्ट स्त्री पुरूष अमाप आहेत. लिहण्यात येणारे लैंगिकतेचे विषय झाकून ठेवण्याची गरज आहे, त्याचे जाहीर प्रदर्शन करण्याची गरज भासते म्हणजे ती व्यक्ती ह्याबाबत कुपोषित आहे, असं सांगणारे अमाप आहेत. हा लिखाणाचा विषय का असू नये? इतके साधे प्रश्नही स्वत:ला विचारता न येणारे अमाप आहेत. लिहणारी स्त्री ही केवळ लैंगिक विषयावर लिहते तर ते फेमस होण्यासाठी असा समज असणारेही अमाप आहेत. घाण बोलणार्याला विरोध केला तर ती व्हिक्टिम असल्याचे दाखवत लोकांकडून सपोर्टसाठी भिका मागत फिरते असं सांगणारे बुळबुळीत भेंडीकापू मागास गंजलेले कोयतेही अमाप आहेत. लिखाणात कुणी कुठल्या विषयावर लिहावं ह्यावर चर्चा करणारे मला गांडू वाटतात.
सेक्सबद्दल लिहणारा पुरूष असेल आणि त्याने त्याच्या किंवा इतर पुरषांच्या सेक्सलाईफबद्दल कथा कवितेतून त्यांची होणारी गळचेपी वा त्यांच्या फॅण्टसी ह्याबद्दल लिहले तर तो एकतर वखवखलेला आहे किंवा बायकोला पुरे पडत नसावा, इंपोटण्ट असावा इथवर चिखल उडण्याइतपत समाज मागास आहे. लिखाण चांगले किंवा वाईट ह्यावर केली जाणारी टीका जर सरल असेल तर त्यावर शांतपणे मतं मांडत असताना चर्चा होत असताना लिहणारी व्यक्ती ही सेक्सच्युअली कॉन्स्टिपिटेड दिसते, मालनरिश्ड दिसते किंवा हेल्दी दिसते हे मुद्दे का यावेत ? कदाचित बोलण्यासाठी बाकी काही उरलेलं नसतं आणि आपण फार मोठं हत्यार वापरत आहो, असा काहीसा समज मनाच्या कुपोषणामुळे होत असावा. केवळ लैंगिकतेवर आधारीत कथा कविता अप्रतिम लिहिता येणं हेही किती जणांना जमू शकेल ? मलाही त्यावर लिहताना अनेकदा बाचकायला होतं. अप्रतिम लिहणं वगैरे तर फार लांब राहिलं.
कुठलाही विषय कोण कसा मांडतो चांगला वा वाईट हे महत्वाचं आहे. स्त्री पुरषांवर कथा लिहताना त्या विश्वाचे खरे अस्सल अनुभव मला यावेत म्हणून मला अनेक पुरषांशीच काय स्त्रियांशीही शारिरीक मानसिक पातळीवर प्रेमसंबंध ठेवावेसे वाटतात. ती घुसळण मला विविध वेदना आणि सुखांच्या पहिल्या अनुभूतीसाठी हवी वाटते त्यासाठी हे मला आवश्यक वाटतं, असं इथे भारतात कोणतीही स्त्री / मी म्हणाले तर तिला वेडं, विकृत, वासनापिडीत म्हणतील. आर्ट ही बेसिक, एव्हरेज वा उच्च प्रकारातली, चांगल्या वा वाईट टाईप मधे मोडणारी असू शकते. त्यावर क्रीटिकल समिक्षा होऊ शकते. पण अनेक चुतिया लोकांना त्यातलं कळत नसल्याने ते उथळ गोष्टींमधेच अडकून पडलेले असतात आणि स्त्रियांना घाण ठरवण्याची संधी शोधत असतात ते अनेकदा उघडकीस येतं. पण लिहणार्या स्त्रियांना लैंगिक विषयावर आपण काही लिहतो म्हणजे ते स्पेशल काही आहे, असं न वाटता त्याकडे फक्त एक फॉर्म म्हणून पाहता आलं पाहिजे. त्यासाठी जे काही स्पष्ट सांगायचं तर वाटेल त्या लेव्हलची घुसळण बिनधास्त करायला हवी. मग अश्या स्त्रियांना कुणी वायझेड म्हणावं किंवा कुपोषित. त्यांना हाड्ड इतकच म्हणावं एकदाच आणि पुढे जावं.
सेक्सविषयी काही लिहणार्या स्त्रिया ह्या उपाशी असतात, तुंबलेल्या असतात, असा विचार करून स्त्रियांची खिल्ली उडवणार्या पुरषांची, स्त्रियांच्या पायातल्या चपलेइतकीही लायकी नसते.
सोशल मिडीयावर किंवा कोठेही स्त्रिया लैंगिकतेवर व्यक्त होतात, लिहतात, बोलतात ह्याचा अर्थ त्या त्यांच्या फाटक्या चड्ड्या गॅलरीत वाळत घालतात, असं बोलणारे षंढ टवाळखोर स्त्रियांनी काय कमी पाहिलेत का? स्त्रियांना इथे काही लिहताना स्वत:विषयक लाज वाटली पाहिजे, असे वातावरण निर्माण करणारे फ्रीजमधले अंडगार वरणभात किती चिंधीचपाट आहेत हे वारंवार दिसलं की हसायला येतं हॉ हॉ हॉ. अश्या विचारांनी मागास असलेल्या पारोश्या हिरोंच्या दिसण्यावर फिदा होऊन त्यांच्यापुढे झिट येऊन गडाबडा लोळणार्या स्त्रिया पाहून तर अजूनच खात्री पटते. अपुन सही जारेल्ला है.

Comments