आता तुझी पाळी मीच देते टाळी

सातवी आठवीत गेलो तेव्हाची मजा. मला पहिल्यापासून धावायचा कंटाळा होता. ट्रीपसाठी बस यायची तेव्हा धावत धावत जाणार्या मुलांना खिडकी शेजारची जागा मिळे. मी आपली सावकाश चढले. माझ्यासारख्याच काही मैत्रिणींना खिडक्या मिळाल्या नव्हत्या. मग त्यांच्या समोरच खिडकीत बसलेल्या मुलांपैकी आपल्याला हव्या त्या सीटपाशी जाऊन उभं राहून सांगितलं, '' मला पाळी आलीये... उलटी वगैरे झाली तर.. मला खिडकी द्याल का.. '' मुलं फूल कन्फ्यूज. उठली बिचारी कोकरं. मला जागा करून दिली आणि स्वत: चौथ्या सीटवर जाऊन बसली. मग रस्त्याचं वळण आलं आणि बस जोरात फिरली की ते सीटवरून खाली पडायचे अशी मज्जा. 
पाळी येण्याचा आणि ओकारी येण्याचा काय संबंध? असं कुणीही विचारलं नाही आणि मला असं कुणी विचारलं तर त्याचं माझ्याकडे उत्तर नव्हतं हे ना त्यांना कळलं ना मला. पण पाळी आल्याने हिला खास जागा दिली पाहिजे हे कर्तव्य आहे आपलं असा कनवाळूपणा मुलांमधे मी जागृत केला हे फार थोर होतं. मी बिनधास्त पाळी आणि ओकारी जोडून दिलं.. मला अशी खिडकी मिळालेली पाहून मग बसमधल्या अजून एक दोघींच्या पाळ्या आल्या नेमक्या तेव्हाच. :p

Comments

  1. हाहाहा कसं सुचलं तुला 😂😂

    ReplyDelete

Post a Comment