जबान हे आपली



पुरषांचे सेक्सलाईफमधला झिरो इंट्रेस्ट आणि रटाळपणा, चालढकलीचे प्रमाण पाहता आणि त्यावरून स्त्रियांमधला वाढता संताप पाहता आता.. हे खालील संदेश लिहून अश्याही पाट्या टाकायला हरकत नाही.
1.  मी हे मान्य करेन की मला सेक्समधलं श्याट काही कळत नाही. मी त्यात महाबोअर आहे. मी रोमांसमधला परफॉर्मन्स आणि त्यातली सेक्समधली वारंवारता सुधारायचा प्रयत्न करेन. - जबान हे आपली.
2. मूल झालं म्हणजे बाई सेक्समधे सॅटीसफाय झालेली असते असे सोयीस्कररित्या पाळलेल्या समजाच्या साखळीत मी कुत्रा म्हणून स्वत:ला पाळून बांधून घेणार नाही - जबान हे आपली.
3. सेक्स ही स्त्रीची प्रायॉरिटी नसते, नसावी असं बोलून मी कधीही माझीच चव तिच्यापुढे घालवून बेईज्जत होणार नाही. - जबान हे आपली.
४. स्त्री मग ती अगदी माझी आई, ताई, वहिनी, काकू, आत्या, मामी कुणीही असेल तिचं वय झालं, तिला मूलं झालं तरीही तिला तिचा जोडीदार हवा तेव्हा, हवा तसा निवडण्याचे व सेक्सचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल. ते मला मान्य असेल. - जबान हे आपली.
५. सेक्सचे स्वातंत्र्य जे की तिचे बोलणे, चालणे, घरात यायच्या जायच्या वेळा, पुरषांमधली ऊठ बस, करीयरचा निवाडा, कपडे ह्या सगळ्यांवर नियम लादून कंट्रोल केले जाते.. त्यात मी सहभागी होणार नाही. - जबान हे आपली.
6. सेक्स ही माणूसप्राणी म्हणून स्त्रीचीही फार महत्वपूर्ण गरज आहे हे समजून घेत तिचा तो अनुभव खास व्हावा म्हणून नात्यातले सारे बुळबुळीतपण बाजूला सारून तिला मादी म्हणून बघण्याचा प्रयत्न करेन. - जबान हे आपली.
७. सेक्सची मागणी करणारी स्त्री विकृत असते हे म्हणण्याआधी, समजण्याआधी मी माझ्या जिभेला चरचरीत डाग देईन - जबान हे आपली.
८. माझ्याकडे माझी स्त्री जेव्हा नर म्हणून पाहते तेव्हा तिला कीळस वाटू नये ह्यासाठी स्वच्छ राहण्यासाठी आणि तिला आकर्षक वाटावं ह्यासाठी प्रयत्न करण्याचा मी तोबा प्रयत्न करीन - जबान हे आपली.
९. स्त्रीला जर मी सेक्स देऊ शकत नसेन तर ती अन्य कुणाकडून ते मिळवित असताना मी ते अनैतिक मानण्याचा नालायकपणा करणार नाही. - जबान हे आपली.
१०. पेंडिग...

Comments

  1. जबरदस्त ...👌👌👌

    ReplyDelete
  2. जबरदस्तच.........🙋🙋🙋🙋🙋🙋😘😘😘😘😘😘

    ReplyDelete
  3. I am your new fan renuka. Just loving every bit.

    ReplyDelete
  4. Kay lihtes g..... So called sanskrutirakshakana heart attack yayacha.. Kalaji ghet ja Bai��

    ReplyDelete
  5. Ek number... Rekho ch writing mhanje naadkhula...Jaban he aapali

    ReplyDelete
  6. Sprite... Sidhi baat, no bakwaas.

    ReplyDelete
  7. ओय होय जबरदस्त ........खरच है चेहरा पाहून माला पण उलटी आल्या सारखे झाले

    ReplyDelete
  8. Your writings serve as a Guide Book for men to understand women

    ReplyDelete
  9. Outstanding, Hat's of��������

    ReplyDelete

Post a Comment