कठीण कठीण कठीण किती..

बाई असण्याचा एक फायदा लक्षात आला आहे. बायकांना पुरूष खूप जास्त प्रमाणात मिळू शकतात. ती अनेक जणांना एकाचवेळी वडील, मुलगा, प्रियकर, नवरा, सखा ( 🤑🤑🤑 ) इ. बनवू शकते तिला जाम ऑप्शन्स असतात. पुरषांकडे मात्र त्या तुलनेने कमी बायका येतात. एका बाईला अनेक सखे मिळू शकतात पण पुरषाला मात्र फार तर फार दोन ते तीन सख्या असतात. पुरषांचे लाईफ कठीण आहे राव.. त्यांना समजून घेणार्या, सतत माफ करणार्या आणि त्यांच्यावर खर्या अर्थाने ते जे जसे आहेत ते स्वीकारून निरपेक्ष प्रेम करणार्या स्त्रिया मिळवण्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागतात.
शिवाय हे करत असताना स्त्रिया रूसण्याचे, त्यांनी लगेच पराचा कावळा करण्याचे प्रमाण भयंकर असल्याने पुरषांची जाम गोची होते आणि त्यांना फार बाचकून जगावं लागतं. स्त्रियांसाठी थोडं सोपं आहे सारं. म्हणजे मित्र म्हणून बाई कुण्याही पुरषाला हलकं किस करू शकते त्याला मिठी मारू शकते आणि मग एक सोज्वळ स्माईल फेकलं की किती छान, मोकळी, हसरी आहे ती असं म्हणतात. पुरषाने असं केलं की मात्र अमममम.. मग तो लंपट, लोचट, गळेपडू, बास्टर्ड 😯😃, हरामी कुठच्या कुठे जातं जग. 
कसे काढतात दिवस पुरूष ह्या स्त्रियांच्या जगात त्यांच त्यांना माहीत. 🤓

Comments

  1. निर्व्याज हा शब्द आहे

    ReplyDelete
  2. बरं झालं हे तू लिहिलंयस 👍👍👍👌💐

    ReplyDelete

  3. खरं आहे. पुरुषांना फार सांभाळुन राहावं लागतं. आणि हल्ली कायदे असे एकतर्फी आहेत कि एखाद्या पुरुषाने बाईकडे जास्त वेळ पाहिलं तरी त्या पुरुषाविरुद्ध FIR दाखल होऊ शकतो.

    ReplyDelete

Post a Comment