Fuck Off

तू इतकं लिहतेस..
सगळं सगळं लिहतेस
अगदी आप्तांच्या मरणाबाबतही लिहतेस..
दिवसाला १५० पोस्टं लिहणं हे अस्थिर मनाचं लक्षण आहे
पुरस्कारासाठी लिहतेस का
( फेसबुकवर लिहून पुरस्कार.. ? )
कुठे ढसाळ आणि कुठे तू
कुठे गौरी आणि कुठे तू
कुठे जी. ए. कुठे पु. लं आणि कुठे तू
कुठे ऊ कुठे मी नी कुठे तू
भिकारचोट, अश्लील, आगलावी
तू मीस्टिरिअस आहेस का
तू एकटी आहेस का
तू नैराश्यग्रस्त आहेस का
दु:खाचे जाहीर प्रदर्शन करणारी आहेस
दु:खाचं भांडवल करणारी आहेस
तू विकृत आहेस
तुला मानसोपचाराची गरज आहे
तू सायकीक आहेस
तू मनकवडी आहेस
तू जे लिहतेस ते तुझ्या
हे असलं घरच्यांना चालतं का
अय्या अय्या हे सगळं तुझ्याबाबत घडलं
ही तुझीच कथा असणार
क्रीएटिव्हिटी इमॅजिनेशचा त्यात काही भाग नसतो खोट्टाडी
तुला मैत्रिणी आहेत का
मित्र.. ते तर असतीलच ढिगाने
तू इतकी सिगरेट का पितेस
पितेस तर मग कोणती पितेस
सिगरेट प्यायल्याशिवाय लिखाण सुचत नसेल ना तुला
दारूही पीत असशील
नाही? का ?
आपण भेटू आणि तेव्हा पिऊ
तुझ्यासोबत प्यायला मजा येईल
दिवा बंद ठेऊन लिहतेस
की चालू ठेऊन
पलंगावर बसून लिहतेस की
टॉयलेट पॉटवर बसून लिहतेस
तो वेस्टर्न आहे की इंडियन ?
तुला पॉटी निळी होते की सोनेरी की सप्तरंगी?
आंघोळ करायला वेळ होतो का
निदान दात घासायला तरी..
तू स्त्री आहेस की पुरूष?
छे शक्यच नाही
स्त्री असून इतकी हिंमत
वाह.. अफाट.. श्शी.. गलिच्छ
सेक्स सिगरेट संबंध इतकंच का लिहू शकतेस तू
आवाका समजला हो कंटाळवाणं फारच
राजकारणावर इतर सामाजिक समस्यांवर बरी लिहीत नाहीस
दांभिक, प्रसिद्धीलोलूप, बिनअकलेची, बोअरिंग
पुरूष विरोधी आहेस काय गं
कट्टर स्त्री वादी आहेस की तथाकथित
तू आणि व्यक्तिवादी.. च्यामायला असं काही असतं का कुठे?
आम्हांला तू आवडतेस पण त्याहीपेक्षा
आमच्या नवर्यांना तू जास्त आवडतेस
का आवडतेस
तू आमच्यापेक्षा वयाने मोठी असूनही हे का होत असावं
असं होऊच कसं शकतं
मग एकतर ते बास्टर्ड आहेत किंवा तू..
हो तू .. तू तर आहेसच
तू आत्ममग्न, स्वत:वर प्रेम करणारी
शो करणारी बाई आहेस
आम्हांला फक्त बोलता येत नाही
ते तुला बोलता येतं
जे आम्ही व्यक्त करू शकत नाही घाबरतो
ते तू न घाबरता लिहतेस इतकाच आणि केवळ हाच
तुझ्यातला आणि आमच्यातला फरक आहे
तुला बर्याच अडचणी आहेत
पण त्या तू दडवून ठेवतेस
आणि लिखाणातून बाहेर काढतेस
तू जे लिहतेस तसच तू जगतेस का
तू शहरात राहतेस
तुला काही कामंधामं नसतील
ऐषारामात लोळत पडलेल्या लोकांना जमतं सतत लिहणं
इ. इ.
..
झालं बोलून.. ? मी ऐकलं. आता मला लिहू दे. Fuck Off.

Comments

Post a Comment