औकात

अंगप्रदर्शन करणार्या स्त्रियांमध्ये स्त्रियांवर होणार्या अत्याचाराविरोधात निषेधाचा आवाज उठवण्याचे उघडे वाघडे सामर्थ्य आहे. तुम्ही काय केलेत? स्त्रियांनी अंग प्रदर्शन केले पाहिजे वा नाही हे तुम्हीच ठरवणार. त्यांनी कोणत्या धर्मातल्या माणसाशी लग्न केले पाहिजे वा नाही हे तुम्हीच ठरवणार. आणि हे सारे असूनही तिला बलात्काराविरोधात निषेध नोंदवण्याचा हक्क आहे वा नाही हे देखील तुम्हीच ठरवणार.. कोण तुम्ही? 😀
बलात्कार मग तो शारिरीक वा मानसिक असो त्याचे समर्थन होऊच शकत नाही, असं सांगणारा एक कार्टुन काही महिन्यांपूर्वी फेमिनिस्टांच्या सार्या भोकांमधे पेट्रोल टाकून त्यांची शुद्धी केली पाहिजे असं बरळून गेला होता.
बरळणार्या माणसांना सारेच अधिकार असतात. तो सर्वज्ञ असतो. काही माणसं दारू न पिताही शुद्धीतही बरळतात.
अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणार्या, अगदी विवस्त्रावस्थेत फिरणार्या स्त्रीलाही बलात्काराचा विरोध करण्याचा हक्क आहे. अंगावर कपडे असतानाही वा नसतानाही एखाद्या स्त्रीकडे पाहून ती आवडणं, तिच्याविषयी वासना जागृत होणं, तिच्याशी संबंध ठेवावे वाटणं, तिच्यावर प्रेम करावं वाटणं हे कुणी मनात ठेवील वा ते बोलून दाखवील. त्याला तिचा होकार असल्यास प्रश्नच मिटला.
पण ती इच्छा नाकारणार्या स्त्रीवर मग भले ती कपड्यांमधे झाकलेली असो वा अर्ध वा पूर्ण विवस्त्र असो; तिच्यावर जबरदस्ती सेक्स लादणं हा अपराध आहे.
अंगप्रदर्शन करणारी स्त्री.. व्यावसायिक गरज म्हणून अंग दाखवणारी किंवा तशी काही गरज नसतानाही हात पाय पोट पाठ अर्ध स्तन चेहरा केस दाखवणारी स्त्री ह्यांना बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत मनातली घृणा व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. ज्या स्त्रिया लोकांची डोकी खराब करून त्यांना नादाला लावतात त्यांना हे सारे बोलण्याचा अधिकारच काय, असं विचारणार्या लोकांची औकात काय्ये आधी.. ते आधी त्यांनी तपासलं तर फार्फार बरं होईल.
औकात समजण्यासाठी कात टाकण्याची गरज असते. 

Comments

  1. तर मग एखाद्या पुरुषाने सार्वजनिक स्थळी हस्तमैथुन केले तर लगेच सगळ्या स्त्रियां का बरळतात ?

    ReplyDelete
    Replies
    1. रेणुका मॅडम म्हणाल्या ना, तसंच बरळताय तुम्ही. स्त्रीचं शरीर हे तिचं स्वतःचं आहे. तिच्यावर तुमचा मालकी हक्क नाही. तिचं शरीर पाहून तुमच्या वासना जागृत होतात, त्याच तिचा दोष आहे, हे दीडशहाणे विचार करणं बंद करा आता. अंगप्रदर्शन करणं हाच जर एकमेव प्रश्न असेल तर तुम्हीही आत्तापासून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कधीही, कुठेही अंगप्रदर्शन करू नका.संपूर्ण कपडे घालून बसा. फिरा. कारण जर बाईने शरीर दाखवणं चुकीचं असेल (तुमच्या लेखी) तर तुम्हीसुद्धा अंगप्रदर्शन करणं हे चुकीचं आहे. आणि राहिला मुद्दा हस्तमैथून करण्याचा. तर एकतर ती एक लैंगिक आणि खासगी कृती आहे. त्यालाही तुमचं समर्थन असेल तर टमरेल घेऊन चारचौघात शौचाला बसा की.. मग नाही बरळणार कुणीही...

      Delete
    2. आजकाल कसे आहे माहित आहे का स्त्रियांनी थोडे बोल्ड कंटेंट वर लिहिले ना कि लगेच 4 लोक गोळा होतात, सेक्स, स्तन, झाट, आणि मनसोक्त शिव्या असे लेखन म्हणजे इंस्टंट प्रसिद्धि चे एकमेव साधन झाले आहे.

      स्त्री ने असे काही लिहिले की लगेच इतर स्त्रियांनी वाह वाह केलिच पाहिजे आणि पुरुष मंडली तर हातात घेऊन तयार असतातच. ताई शब्द जोडला की मग कुणी ऑब्जेक्शन घेण्याचे देखील कारण उरत नाही. असो.....

      Delete
    3. ह्या शब्दांचा बोल्ड ते काय.. आम्ही हे सारं लिहताना काही वेगळं लिहतोय असं वाटतही नाही. तुम्ही अजून त्याच दलदलीत बेडकांसारख्या उड्या का मारताय दादा?

      Delete

Post a Comment