राईस फेस वॉश

घरी बनवलेले फेसवॉश, स्क्रब आणि फेसपॅक वापरणे हा महाग्रेट अनुभव आहे. बनवायला मजा येते. सारे काही स्वयंपाक घरातून मिळते. आंघोळ करताना आपण आपल्यासाठी महान खास करतो आहे, असं वाटून त्वचेतून लाईट बाहेर येतोय असे भासही होवू लागतात.
फेसवॉश, स्क्रब, फेसपॅक, शांपू घरच्या घरी तयार करत असताना त्यात विविध प्रकारच्या चिजवस्तू कल्पकतेने वापरू शकतो. ह्यातले वापरण्याचे बहुतांश दही, मध, साखर, लिंबाचा रस, टॉमेटो, नारळाचं दूध, नारळ तेल,
ऑलिव्ह ऑईल, मुलतानी माती, चंदन पावडर, काकडी, बटाटा, हळद, अळशी, कॉफी, तांदूश , दूध, अंड, भोपळा, तुळस, नीम, ग्रीन टी, कोरफड आपल्याकडे कायम असतेच. त्याची कॉम्बिनेशन्स करून हे सारं चुटकीत करता येतं. उन्हाळ्यात मुंबईतल्या चिकचिकाटात घरी तयार केलली स्क्रब्स वापरून आंघोळ केल्यावर अतिशय स्वच्छ स्वच्छ झाल्यासारखं वाटतं.
घरात एका छोट्या माणसाकडून ह्या नव्या योजनेला भोकाडयुक्त प्रतिसाद मिळतो आहे. बाथरूममधे लक्ष ठेऊन आईबाप नसताना तयार केलेले स्क्रब ओतून देणे, शिकेकाई रिठ्याचे पाणी टाकून मग मग्गा स्वच्छ धुऊन ठेवणे अश्या कारवाया केल्या जात आहेत. पण मी त्याला कधीचच सांगितलेलं आहे की, ह्या घरची गुंड मी आहे हॉहॉहॉ. पण तो विसरतो अधेमधे.

घरगुती फेसवॉश रेसीपी
..
Rice Face wash




अर्धी वाटी कोणाताही तांदूळ
गुलाबपाणी
केशराच्या काड्या २ ते ३


तांदूळ व्यवस्थित चोळून धुऊन घ्यायचे. मग त्यात भरपूर पाणी घेऊन तांदूळ मोकळ्या भांड्यात शिजवायचा. तांदूळ पूर्ण शिजला आणि मऊ होत आला की गॅस बंद करायचा. भाताचे सारे पांढरे पाणी गाळून घ्यायचे. गार झाल्यावर त्यात गुलाबपाणी टाकायचे, केशराच्या टिकश्या टाकायच्या आणि तो द्राव बाटलीत भरून फ्रीजमधे भरून ठेवायचा. चेहरा धुताना बाटली हवलून घ्यावी हातावर घेऊन चेहर्यावर चोपडायचे. हलक्या हाताने चेहरा मसाज करायचा आणि मग थंड पाण्याचे हबके मारून चेहरा धुवायचा. सिंपल.
 मी आंघोळाला जाण्याअगोदर हा द्राव काही वेळ चेहर्याला लाऊन ठेवते. मग ते सुकले की आंघोळ करते. घाईत झटपट चेहरा धुतानाही आधी काही वेळ ह्याने मसाज करून मग चेहरा धुते.
युट्यूबवरती व्हिडीयो पाहून मी हे प्रयोग करतेय. मजेखातर. माझा ह्यात काही अभ्यास नाही. केवळ किडे म्हणून हे प्रयोग चाललेले आहेत ह्याची नोंद घ्यावी, मला गोरं होण्याचं खूळ अज्याबात नाही. हम दिलवाले है. शानसे काळे है. 

Comments

  1. अत्यंत महत्त्वाची अन उपयुक्त रेसिपी ...👌💐

    ReplyDelete

Post a Comment