कमिनी ये चाय जिंदगीभर याद रहेगी..

भोईवाडा कोर्टाबाहेरची चहाची टपरी
वेळ दुपारी एक बिक

मला म्हणजे जिथे जाईन तिथे चहा हवाच. फार आगाव आहे मी. पण चहा लागतोच्च. तिथे एक टपरी दिसली.
ताई एक कटिंग द्या
ताई एका कळकट्ट कपात थर्मासमधला चहा ओततात. चहा पाऊण कपच भरतो. कपात थर्मास झटकून झटकून शेवटचेही सारे थेंब ताई देतात.
ताई.. अम...ममम.. अममम कटिंगचा तो ग्लास असतो ना मला त्यात चहा फार आवडतो. तो आहे का हौ तुमच्याकडे.. असेल तर त्यात द्याल का चहा.. मी आपलं फार प्रेमाने विचारलं. मला तो कळकट्ट कपही आवडला नव्हता.
त्यावर ती बाई कप धुण्यासाठी तिथेच खाली ठेवलेल्या एका बादलीपाशी वाकली होती ती तरातरा उठली आणि भराभरा काऊंटरपाशी आली. माझ्या हातातला कप त्या निष्ठूर पापी स्त्रिने ओढून घेतला आणि त्यातला सारा चहा पुन्हा थर्मासमधे ओतला.
'' नको चहा तर नका पिऊ. र्हावदे. मला ज्येवायला जायचं.'' असं फणकार्याने म्हणून तिने काऊंटरच बंद करून टाकलं. काय तो चेहरा केला होता तिने नंतर मख्ख. मै तो हक्काबक्का रेह गयी. हातात असलेला चहा काढला तिने चहा.. इतका अपमान करण्यासारखं माझं नक्की काय चुकलं मला कळलच नाही. ती तरातराच निघून गेली. 

मग मी लांब कोपर्यात जाऊन स्वगत - 
म्हणूनच तुम्ही मराठी लोकं कायम असे चहा करत राहणार रस्त्यावर चहा. नको तिथे अभिमान दाखवतात. काचेचा ग्लास आहे का विचारलं तर इतका राग आला ह्या बाईला माझ्या हाता ओठाशी आलेला चहा हिरावून घेतला हिने हिला नरकातही चहा मिळणार नाही कधी, असं मी हळूहळू बडबडले.
नै काही कारण होतं का थंडगार चहा माझ्या हातून काढून घेण्याचं... मी जर तिला सांगितलं असतं ना की मी कोण आहे तर... हं हं हं.. घरून चहा करून तोही स्पेशल आलंबिलं घालून, म्हशीची ताजी ताजी दुधाची धार काढून त्याचा चहा बनवला असता तिने. पण आपण आपला मोठेपणा कुणाला सांगायला जात नसतो. जया अंगी मोठेपण तया चहा मिळणेही कठीण..
मला आजवर भेटलेला एकही टपरीवाला असा माजखोर नव्हता. पुरूष ते पुरूषच. त्यांच्या प्रेमाची सर.. जाऊ दे खूप वाईट वाटले मला. चहा नाही दिला मला तिने.. एकदा तिच्या टपरीवर जाणार आहे आणि तिचं लक्ष नसताना फूल गिर्हाईक जोरात आलेलं असताना तिच्या उकळत्या चहाच्या पातेल्यात सहा चमचे मीठच टाकून देणारे. 
मला चहा दिला नाही म्हणजे काय.. ओतलेला चहा पुन्हा थर्मासमधे ओतून दिला तिने हे किती वाईट आहे.. कुणी वागते का असं गिर्हाईकाशी..? खूप वेळा लिहलं ना मी हे वाक्य चहा दिला नै चहा दिला नै.. सोचो मेरा दिल कितना जला होगा.. 😨😨

Comments