हुंगणारा कुत्रा नको गं बै.

एकदा एक मैत्रीण भारी अवस्थ झाली होती. न राहवून शेवटी बोलली. तिचा बीएफ तिच्या निकर हुंगत असे. तेही तिला दाखवून. आपण कसे कूल आहोत, असा चेहरा करत हा प्रकार करायचा. तिला त्यात काहीच रोमॅंटिक वाटायचं नाही. पण बळबळं चेहर्यावर गुलाबी शरम आणण्याचा अभिनय ती करत असे. तो प्रकार ऐकून आधी मी अवाक् झाले आणि नंतर मला जाम हसू आलं. त्याने ती अजूनच वैतगली.
हे अंतवस्त्र हुंगणे प्रकार किती डेंजर रिस्क आहे. माणसाचा काही भरौसा नाही. तसंच अंतवस्त्रांना हमेशा सुगंधच आला पाहिजे, ही अपेक्षाही अवास्तव वाटते. माझीच मोरी नी मुतायला चोर अशी अवस्था का करावी समोरच्याची? म्हणजे बॉयफ्रेंडला भेटायला जाताना पादायला आले तर टेंशनच होईल की अश्याने.
एकमेकांचे टीशर्ट, कुर्ते इ. घालणं ठीक आहे. पण परस्परांच्या चड्डी, ब्रा, अंडरवेअर घालणं.. ह्यात उच्च कोटीचा रोमांस काय असतो ते कळत नाही. एकदा आमच्या लांब लांबच्या मामींनी त्या नवर्यासोबत बाहेरगावी गेल्या होत्या. तेव्हा त्यांची ब्याग त्या येश्टीतच विसरल्या. पावसात कपडे ओले झाले होते. तेव्हा त्यांनी काय केलं.. लग्नाच्या कार्यालयात झटपट कुठूनशी साडीचोळी मिळवली पण चड्डीचा बंदोबस्त काय झाला नाही तेव्हा यजमानांचीच अंडरपॅंट नाईलाजाने घातली होती, अशी गोष्ट घरातल्या चार बैका खूसुफुसू करत असताना ऐकली होती. पण ते वेगळं. हा हुंगणे प्रकार म्हणजे भलताच की हो.
एकमेकांचे कपडे घालतात, क्रॉस ड्रेसिंग करतात, परस्परांची अंतर्वस्त्रही काही जोडपी मजा म्हणून घालतात. काहींना ते जाम आवडतं, असं तो सांगता होता हे जेव्हा मैत्रिणीने सांगितलं तेव्हा मात्र भयानक हसू आलं मला. मैत्रीण कम्माल हेफ्टी आहे आणि तिचा बीएफ एकदम लुकडा. म्हणजे हिची निकर घातली की ती त्याला शॉर्ट्स घातल्यासारखी दिसणार. काढला तिने एक दिवस त्याच्या गळ्यातला पट्टा. हुंगणारं कुत्रं नको बै आपल्याला म्हणाली.

Comments

  1. Tukar likhan..ashi faaltugiri lihinya peksha Kahi tari changla liha..pan tya Sathi changla lihayla yayla pahije

    ReplyDelete

Post a Comment