लहानपणीच पोहायला शिकले असते तर..

तीन फूट खोल पाण्यातही आपण जरा उलटेपालटे झालो की गटांगळ्या खायला लागतो हे सांगायलाही खूप लाज वाटते. अश्या पाण्यात वज्रासन घालून बसलं आणि लयदार पोहायला हलवतात तसे हात हलवून पाणी कापलं तरी पुढे पुढे सरकायला होतं आणि जरा आनंद मिळतो. सहा सात फूट खोल पाणी असलं की उभ्याने पोहण्याचीआपली सर्कस पाहून लाज वाटत असतानाच आपला नवरा किंवा मुलगा त्याच पाण्यात सूर मारून माश्यासारखे इथून तिथे तिथून इथे सुळ्ळूक्क करून पोहून दाखवतात तेव्हा ओठावर हास्य आणि जिभेवर कडू पसरलेलं असतं. पोहायचं तर पोहा की चूपचाप.. नाही येत मला. भीती वाटते खूप आणि वाईटही वाटतं. मी काय क्रू? 😭😭
मला जर ल्हानपणीच शिकू दिलं असतं पोहायला तर समुद्रातल्या माश्यांनाही मी पोहण्यात हरवलं अस्तं. 🤨 लहानपणीच शिकवावं आपल्या मुलांना हे सारं.. मग सहज जमतं. नाहीतर मोठं झालं की अशी कन्फेशन देणारी पोस्टं लिहावी लागतात.
कन्फेशन - मला पाणी खूप आवडतं. पण पोहायला येत नाही त्यामुळे पाण्याची भीती वाटते आणि आपण कायम पाण्यात बसलेल्या म्हशीसारख्या स्वीमिंग पूलमधे पडलेल्या असतो ह्याचे फार्फार वाईट वाट्टे.

Comments

Post a Comment