कीड

कीड लागलेलं झाड
पूर्ण पोखरलं गेल्यावर
शांतपणे कोसळून पडतं
काही नाती अशीच संपतात
ह्या कानाचं त्या कानाला कळत नसतं
अबोल कीड संपूर्ण पसरेपर्यंत
ह्या पानाचं त्या पानाला जसं कळत नाही
अगदी तसच.

Comments

Post a Comment