फवाद

फोर्ब्ज लाईफ मॅगझिनसाठी विकास खोत ह्यांनी काढलेला फोटो. 

संजिवनीने चांगली दोन दिवस सुट्टी मारली होती म्हणून मी कावलेली होते. पण त्याच दिवशी मी नेटफ्लिक्सवर  ' जिंदगी गुलजार है ' चे सलग एपिसोड पाहिल्याने मनात गारवा निर्माण झाला होता. फवाद खानवरून डोळे बाजूला काढून ठेवणं अशक्य आहे. तो अशक्य देखणा आहे आणि त्यावर काहीच ईलाज नाहीये. संजिवनी आली तेव्हाही मी एपिसोड्सच पहात होते. फवादला पाहणं सोडून इतके दिवस तिने का बुट्टी मारली हा विषय काढण्याचा मूडच नव्हता. तिला म्हंटल थांब गं जरा बघ ह्याच्याकडे. सगळ्या स्त्रिया पागल आहेत ह्या फवादच्या मागे. हातातली कामं टाकून तिही कंबरेवर दोन हात ठेऊन विठोबासारखी टीव्हीकडे पाहत बराच वेळ थांबली आणि मग गालातल्या गालात हसायला लागली. अद्भूत आहे, एखादं माणूस इतकं राजबिंडं कसं काय दिसू शकतं.. अशी माझी टकळी सुरू झाली. तिला त्यातला शब्दन शब्द पटला होता.
मग मी म्हणाले, संजिवनी आपल्याला का नाही गं असे बॉयफ्रेंड आणि नवरे मिळाले इतके देख्खणे..
ती पटकन म्हणाली, काय करायचं ताई.. अपना नसिब गांडू तो क्या करेगा पांडू..
मी ते ऐकून जी आजारी पडलेय ती अजून त्या धक्क्यातून बाहेर पडू शकलेली नाहीये. 


फोर्ब्ज लाईफ मॅगझिनसाठी विकास खोत ह्यांनी काढलेला फोटो.

Comments

  1. मग.. पुरुषांनाही तस्सेच होत असते.तुमच्या बाबत आत्ता आत्ता समजत

    ReplyDelete

Post a Comment