चहा हाच धर्म

कितीही मरायला होत असेल तरी अश्या भयंकर उन्हाळ्यात वा ऑक्टोबर हिटमध्ये शेवटच्या घटका मोजणार्या माणसालाही चहा हवा असतो तेव्हा चहाची आवड असणार्यांना दिवसातून पाच वेळा चहा द्या.
उकाड्डा कित्तिये आणि चहा..????? चहा जास्त बरा नाही हं जास्त बरा नाsssही.. हं हं दोन कप झाला आता अजून किती पिणारात..? चहाने उष्णता वाढेल फोड फोड येतील तोंडावर आणि कुठे कुठे मग बसा बोंबलत... झालाय दोन कप आता अर्धाच कप घ्या.. चहाने पित्त होईल उलट्या होतील.. असं सांगून एखाद्याला जिते जी मारू नका. चहा गरमच द्या. थंड चहा प्यायल्याने गरम होणं कमी होत नाही. सगळ्यांनी भरपूर चहा प्या. घरात दूध संपलं असेल तर शेजार्यांकडून एक कप दूध आणून चहा करा पण चहाबाजांची इच्छा मारू नका हो मारू नका. चहातून भरपूर पाणी पोटात गेल्याने डीहायड्रेशन होत नाही. ब्लॅक टी आणि लेमन टी न ग्रीन टी नी कषाय बिषाय मिशनमध्ये भरीला पाडून भ्रष्टाचार करू नका. चहा पिणे ही एक साधना आहे. हे एक मिशन आहे. ज्याचा उद्देश काय ते विचारू नये. चहा हाच धर्म आहे आणि चहाच्या भुकटीत ईश्वर आहे. ह्या देवावर आले, वेलची, दालचिनी, गवती चहाची फुले भक्तीभावाने यथाशक्ती अर्पण करावीत. जय चहा. जय आले, जय कटिंग. जय वाघबकरी. जय सोसायटी. जय गाळणे. जय कप. जय बशी. जय मारी. जय खारी.
..
जनहितार्थ जारी.


Comments