तुझ्या मनात खूप माणसं फिरतात
मन म्हणजे मोकळ्या मैदानावर भरलेला बाजार
तिथे व्यवहार होत राहतात
डोळ्यात मात्र घर असतं
त्या घराच्या पत्त्यावर कुणाचा मुक्काम आहे?
ह्याचं उत्तर शोध.
मग आसवं कुणासाठी ढाळावीत न ढाळावी
ह्याची उत्तरं आपोआप मिळतील.

Comments